२१ सप्टेंबर, जागतिक शांतता दिवसाच्या निमित्ताने.. Peace cannot be kept by force. It can only be achieved by understanding. - Albert Einstein हिरोशिमा आणि नागासाकी सारखे प्रचंड महाविस्फोट घडवून आणल्या पासून प्रत्येकाला अणुशक्तीचे भय आणि महत्व कळाले. ज्याच्याकडे अणु स्फोटके जास्त तो देश लष्करीदृष्ट्या जास्त शक्तिशाली. त्यामुळे आज घडीला सर्व मोठी राष्ट्रे अणुशक्तीला (Nuclear Power) घेऊन स्वतःला जास्तीत जास्त स्वयंपूर्ण कसे होता येईल याकडे लक्ष देतात. त्याचे कारणही तसेच. तुमची कितीही जरी इच्छा नसली तरी बाजूचे राष्ट्र जर अर्थसंकल्पात लष्कर या घटकाला सर्वोच्च प्राधान्य ठेवून करोडो रुपयांची रक्कम या एकाच मोठ्या भागासाठी वळती करत असतील आणि एका पेक्षा एक प्रगत अणू चाचण्या घेत यशस्वी झाल्याचे वृत्त प्रसारित करत असतील तर स्वसंरक्षणाखातर स्वतःसही यावर किमान तितक्याच समांतर ताकदीने काम करावे लागते ही वस्तुस्थिती. आणि हल्ली कोणाला शांतता नकोच आहे. कारण शांतता प्रस्थापित झाल्यास शस्त्रास्त्रे बनवण्याची जी भली मोठी बाजारपेठ आहे तिचे अस्तित्व धोक्यात येते. जे अर्थकारणातल्या जगाची एक टक्का लोकसंख्या व्य...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स